औरंगाबाद : नंदनवन कॉलनी, शांतीपुरा वार्डा अंतर्गत रस्त्याचे सिमेंट - काँक्रीटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन औरंगाबाद मध्यचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.
या रस्त्याचे काम तब्बल 25 वर्षीच्या प्रतिक्षेनंतर करण्यात येत असून,शांतीपुरा परिसरातील नागरिकांची त्रासातून मुक्ती होणार आहे.
या रस्त्याचे काम सुनील वडागळे चौक ते शांतीपुरा डीपी पर्यंत करण्यात येणार आहे.
अनेक दिवसांपासून शांतीपुरा भागातील रहिवासी रोड बनवण्याबाबत मागणी करत होते.
माजी नगरसेवक जेम्स अंबिलढगे, शिवसेनेचे श्रीरंग आमटे, राजेश रानडे यांनी हा रस्ता करण्याबत पाठपुरावा करत आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याकडे निधी देण्यासाठी मागणी केली होती.
त्याचे फलस्वरूप या रस्त्याचे काम सुरू झाले.याप्रसंगी शांतीपुरा परिसरातील नागरिकांनी आमदार जैस्वाल साहेबांनकडे विविध समस्या बाबत कैफियत मांडली,यावर लवकरात-लवकर राहिलेले रस्त्याचे काम पूर्ण करू आश्वासन दिले.या कार्यक्रमाचे संयोजन राजेश रानाडे,रॉबर्ट अर्नाजलम,वैभव साठे,यांनी केले होते.
याप्रसंगी रेव्ह.एस.वाय.घुले, मोझेस वडागळे, माजी नगरसेवक जेम्स अंबिलढगे, माजी शाखाप्रमुख श्रीरंग आमटे पाटील, शाखाप्रमुख जोसेफ पाटोळे, मनोज निर्मळ, रविंद्र निर्मळ, बिपीन निर्मळ, प्रदीप ताकवाले, राजेंद्र निर्मल, उपशाखाप्रमुख पीटर पवार, किरण वडागळे, जॉन पाटोळे, प्रवीण गवळी, सुनील गवळी, हेमंत ससाणे, रंजना गवळे, सुशीला खेत्रे, प्रमिला साळवे आदी उपस्थित होते...
आपला आभारी राजेश रानडे
शिवसैनिक शांतीपुरा,नंदनवन कॉलनी
संभाजीनगर (औरंगाबाद).
मो.8055170007
न्यूज 24 खबर
औरंगाबाद छावणी प्रतिनिधी : विशाल पठारे
0 Comments