उस्मानाबाद : कळंब तालुक्यात चेतन शिंदे आणि अनील हजारे यांच्या नेतत्त्वाखाली धडक मोर्चा काढण्यात आला.
या आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला पुरुषांनी सहभाग घेतला. आंदोलनाची सुरूवात जयभीम चौक आणि शिवाजी महाराज चौक येथून केली. आंदोलन हे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया पर्यंत समाज बांधवांच्या उपस्थितीत पार पडले..!!
या मोर्च्यात अनेक पदाधिकारी यानी प्रशासनाने नाहक गरीब लोकांवर अन्याय केला याचा जाहीर निषेध आपल्या भाषणातून व्यक्त केला.
उपविभागीय अधिकारी यांना निवेनाद्वारे आपल्या मागण्या मांडल्या त्या पुढील प्रमाणे.
१] गायरान जमीन मालकी हक्क द्या २] पदोन्नीतील आरक्षण पूर्वत करा ३] खामसवाडीतील गायरान जमिनीवरील घरे पाडणाऱ्याला आरोपींवर गुन्हे दाखल करा ४] मागासर्गीय उउद्योजकांना ५००० कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करा ५] सर्व महामंडळ यांचे कर्ज माफ करा..
अशा मागणीचे निवेदन यावेळी उपविभागीय अधिकारी यांना चेतन शिंदे आणि अनिल हजारे यांच्या नेतृत्वात उपस्थित महिला आणि पुरूषांनी कार्यालयात दिले..!!
0 Comments