नाशिक शहर बस लोकार्पण सोहळा संपन्न
नाशिक:- दि:-८/७/२०२१ रोजी दुपारी १२ वाजता मा. माजी मुख्यमंत्री आ. देवेंद्र फडणवीस व नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले.
बसचे वैशिष्ट्य सांगत असताना असे सांगितले की, बसच्या मागच्या व पुढच्या बाजूस सिसिटिव्ही लावण्यात आले असून अपंग व विकलांग व्यक्तींना स्पेशल व्हील चेअर सीट ठेवण्यात आली आहे. महिला वर्गासाठी वेगळी आरक्षित सीट ठेवण्यात आली आहे.
तसेच या बस ला ट्रॅक करता येणार आहे व या बस साठी ॲप, वेब साईट व पेमेंट यु .पी .आय ची सुविधा पण देण्यात आली आहे.
ॲपच्या माध्यमातून बस कुठे आहे,बस चा थांबा कुठे आहे, ड्रायव्हर नीट बस चालवतोय का या सर्वांचे नियंत्रण असणार आहे.
या बसचे स्टॉप हे स्पेशल असणार आहेत जे अॅप द्वारे क्षणात लक्षात येईल व कुणाची धावपळ होणार नाही.
सध्या सिटी साठी ५० बसेस सुरू केल्या आहेत व काही काळात २०० पर्यंत नेणार आहे. आगामी काळात इलेक्ट्रिक बसेस ला अधिक प्राधान्य देणार असून ५० बस इलेक्ट्रिक असणार आहेत. याचा ठराव हा केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे.
महापौर सतीश कुलकर्णी, माजी मंत्री गिरीश महाजन, उपमहापौर जयकुमार रावल, विकास मंत्री एकनाथ शिंदे (फेसबुक लाइव्ह), आमदार सीमाताई हिरे, राहुल ठीकरे, देवयानी फरांदे, माजी आमदार बाळासाहेब सानप, प्रमुख उपस्थिती माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत पालकमंत्री छगन भुजबळ आदी मंत्री व नाशिक चे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रतिनिधी : अनिकेत मशीदकर
0 Comments