खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

राहुरी पोलीस ठाण्यात दोन महिला व दोन पुरूष अशा चार जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल

अहमदनगर : राहुरी तालूक्यातील खडांबे खुर्द येथे एका विवाहित तरूणीची बदनामी केली म्हणून ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत, तब्बल चाळीस लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दिनांक ५ ऑगस्ट रोजी राहुरी पोलीस ठाण्यात दोन महिला व दोन पुरूष अशा चार जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला
दिनेश बाळासाहेब सगळगीळे, अनिता दिनेश सगळगीळे, प्रतिभा बाळासाहेब सगळगीळे व चंद्रशेखर पवार सर्वजण राहणार खडांबे खुर्द, ता. राहुरी अशी आरोपींची नावे आहेत.


राहुरी तालूक्यातील खडांबे खुर्द येथे ३१ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता रामेश्वर बाबासाहेब हरिश्चंद्रे, विनायक राजेंद्र गर्जे दोघेही राहणार खडांबे खुर्द व बापू रोहिदास ससाने राहणार गुंजाळे यांच्या समवेत आरोपींचे भांडण झाले होते. 
आरोपीच्या कुटुंबातील एका महिलेचे गावातील दोन जणांशी अनैतिक संबंध असल्याची चर्चा करून, समाजात बदनामी केल्याचा आरोप आरोपींनी केला होता. 
त्यावरून भांडण विकोपाला गेले, आरोपींनी राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. 

त्यानंतर आरोपींनी हरिश्चंद्रे, गर्जे व ससाने काम करीत असलेल्या ट्रॅक्टर मालक भगवान गोवर्धन कल्हापुरे राहणार खडांबे खुर्द यांच्या मोबाईलवर फोन करून, चौघांनी समाजात आमची बदनामी केली. 
त्यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून, त्यांना जेलमध्ये पाठवू अशी धमकी दिली. 

हे प्रकरण मिटविण्यासाठी चाळीस लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. 

ट्रॅक्टर मालक कल्हापुरे यांनी त्यांची एवढे पैसे देण्याची आर्थिक परिस्थिती नाही. 
असे सांगितल्यावर त्यांनी दोन एकर जमीन विकून आम्हाला पैसे द्यावेत. अशी आरोपींनी मागणी केली.

याप्रकरणी रामेश्वर बाबासाहेब हरिश्चंद्रे वय २४ वर्षे याच्या फिर्यादीवरून आरोपी दिनेश सगळगिळे, अनिता सगळगिळे, प्रतिभा सगळगिळे व चंद्रशेखर पवार या चार जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा नोंदविण्यात आला. 

या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools