उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जि.प प्रशाला शिराढोण ता कळंब येथे एस एस सी प्रमाणपत्र परीक्षा व एन एम एम एस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा या कार्यक्रमात उपस्थित राहुन गुणवंत विद्यर्थ्यांचा सत्कार केला.
कु गंगणे श्रुती भाग्यवंत 96% एस एस सी परीक्षा शिराढोण गावातून प्रथम आली आहे, तर कु जाधवर वैशाली विनायक, चि. खडबडे आदित्य महादेव, कु. गुरव रिद्धी राजेंद्र एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती धारक
यांचा गौरव केला.
कु गंगणे श्रुती भाग्यवंत 96% एस एस सी परीक्षा,
कु. जाधवर वैशाली विनायक, चि. खडबडे आदित्य महादेव, कु. गुरव रिद्धी राजेंद्र एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती धारक
यांचा गौरव केला.
यावेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. काळे ताई मुख्याध्यापक सुनिल अहिरे, श्री शहाजी दादा पाटील, पंचायत समिती सदस्य राजेश्वर (बप्पा) पाटील, अवधूत पाटील, महादेव खडबडे, हिम्मत जाधवर, राजाभाऊ गुरव तसेंच प्रशालेचे सर्व शिक्षक व्रंद उपस्थित होते.
तसेच श्री कैलास कांबळे यांनी दोन विद्यर्थिनी चा 9 वी 10 वी चा शैक्षणिक खर्च उचलल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन
यावेळी करण्यात आले.
एन एम एम एस परीक्षा मार्गदर्शक कांतीलाल गणगे, कैलास कांबळे, शिवराज मेनकुदळे, धनंजय भिसे, संघशील रोडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघशील रोडे यांनी केले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले अशी माहिती पत्रकार अमोल रणदिवे यांनी दिली.
0 Comments