खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

पतीने पत्नीच्या डोक्यात दगड व तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे

अहमदनगर : परगावी असलेल्या मुलाला भेटायला जाण्याच्या कारणावरून पती पत्नीमध्ये वाद झाले, पतीने पत्नीच्या डोक्यात दगड व तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे गुरूवार दिनांक १९ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. 
या प्रकरणी मयत महिलेची मुलगी बाली बाळू निकम वय 22 हीने वांबोरी दूरक्षेत्रात तक्रार दाखल केली.

या घटनेतील मयत अलका वसंत शिंदे वय 45 ही आपला पती वसंत लक्ष्मण शिंदे राहणार गुंजाळे ता राहुरी याला म्हणाली मला मुलाला भेटण्यासाठी बांगर्डे तालुका श्रीगोंदा येथे जायचे आहे. 
परंतु पती वसंत याने तिला जाण्यास विरोध केला, या कारणावरुन पती पत्नीमध्ये कडाक्याचे भांडण झाले, त्यात रागाच्या भरात त्याने अलका हिच्या डोक्यावर व छातीवर धारदार हत्याराने वार करून डोक्यात टनक वस्तुने जबर मारहाण केली, त्यात अलका हिचा जागेवरच मृत्यू झाला.
गुरुवारी सकाळी सात वाजता संशयित आरोपी वसंत याने मुलीला जाऊन सांगितले की, तुझी आई झोपलेली आहे. तिला जाऊन बघ. असे सांगून आरोपी डोंगराकडे पळत गेला. 

त्यानंतर आईचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच मयताची मुलगी बाली हिने तात्काळ वांबोरी पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली. 
त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागीय उपअधीक्षक संदीप मिटके, राहुरीचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव

सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग राजपूत, हवालदार रवींद्र डावखर, चंद्रकांत बराटे, संतोष राठोड, रमेश शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेऊन परीस्थितीची पाहणी केली.

डोंगराच्या दिशेने पळून जाऊन लपुन बसलेला संशयित आरोपीचा स्थानिक गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले व गुन्ह्याचा उलगडा झाला. 

दरम्यान मृतदेह वांबोरी ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवीन्यात आला, अशी माहिती मिळाली आहे, या घटने बाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools