औरंगाबाद येथे तापडीया नाट्य मंदिर येथे भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने मराठवाडा विभागीय मेळावा 16 ऑगस्ट रोजी दुपारी 4:30 वा संपन्न झाला ..
यावेळी मेळाव्याचे उदघाटक प्रदेशाध्यक्ष महाराष्र्ट काँग्रेस कमिटी नानासाहेब पटोले तर मेळाव्याचे अध्यक्ष माजी समाजकल्याण विभाग तथा प्रदेश कार्यअध्यक्ष महाराष्र्ट काँग्रेस कमिटी हे होते.
नाना पटोले यांचे भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी खा उत्तमसिंग पवार, नगरसेवक संगिताताई हंडोरे, दिनकर ओंकार, प्रमोद रत्नपारखे, सुधाकरभाई निकाळजे आणि इतर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या भव्य सत्कार सोहळ्यात उपस्थित होते.
महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्हाअध्यक्ष व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पहावयास मिळाली.!
0 Comments