15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण वाचनालय स्मृती वाचनालयाच्या कदमापूर आणि कोळसूर (गुं) येथील शाखांचे भव्य असे उद्घघाटन करण्यात आले..
यावेळी कदमापूरचे सरपंच मारुती मंडले, पोलिस पाटील मनमोहन झाकडे, प्रकाश कुंभार, देविदास तलमोडे शेखर सुरवसे इत्यादी मंडळी उपस्थित होती.
श्री. शिवबाबा सेवा प्रतिष्ठान तर्फे वाचनालयासाठी २१ पुस्तके आशुतोष महाराज यांच्या हस्ते भेट देण्यात आली.
कोळसूर (गुं) येथील वाचनालयाच्या शाखेचे उद्घाटन सरपंच सौ. सविताताई शिरसे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी उपसरपंच श्री. अरविंद कांबळे, श्री. भाऊसाहेब सुर्यवंशी, श्री. बालाजी सुर्यवंशी व इतर गावकरी उपस्थित होते.
दोन्ही ठिकाणच्या उद्घाटन समयी ॲड शितल चव्हाण, फाऊंडेशनचे अध्यक्ष सत्यनारायण जाधव
उपाध्यक्ष व्यंकट भालेराव, सचिव किशोरभाऊ औरादे, सहसचिव करीमभाई शेख, खजिनदार धानय्या स्वामी
तसेच ॲड ख्वाजा शेख, प्रदिपजी मोरे, पंकज मोरे, रीतेश चव्हाण, विजय चितली यांची उपस्थिती होती.
प्रा. शामराव रघुनाथ चव्हाण स्मृती वाचनालयाच्या ७ शाखा कार्यान्वित झालेल्या असून एकूण ११ शाखांचा संकल्प आहे..
0 Comments