रत्नागिरी : अपघाताला निमंत्रण देणारे महामार्गावरील खड्डे अखेर नवनिर्मिती ने भरले
महामार्गावरील खड्डे भरण्यास उकशी मोहल्ल्यातील युवकांनी दिले योगदान
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 हा खड्डेमय झाला असून महामार्गावर ती खड्डेच खड्डे असल्याचे दिसून येत आहे.
महामार्गावर ती महिन्याभरात दहा ते बारा अपघात झाले असून दोन दिवसांपूर्वी वांद्री येथे मोठा अपघात झाला असून त्यात होणारी मोठी जीवितहानी टळली आहे.
महामार्गावरील मोठा खड्डा चुकवत असताना भला मोठा ट्रक विरुध्द दिशेने जाऊन सुमारे 100 ते 120 फूट दरीत कोसळला होता. या महामार्गावर ती छोटे-मोठे मोठ अपघात या खड्ड्यांमुळे होत आहेत.
महामार्ग से खड्डे भरा असे दरवेळेस आव्हान आणि विनंती करून सुद्धा संबंधित प्रशासन या ठिकाणी दुर्लक्ष करत होते मात्र सालाबाद प्रमाणे नवनिर्मिती फाउंडेशन आणि उकशी गावातील युवक या महामार्गावरील पडलेले खड्डे भरत असतात.
त्याच प्रमाणे या वर्षी प्रशासन खड्डे भरेल याची वाट पाहत होते मात्र ढिम्म असलेले प्रशासन या खड्ड्यात कडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे दिसून आल्याने अपघातांची संख्या वाढत होती त्यामुळे नवनिर्मिती फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज यांनी पुढाकार घेत गाव विकास समितीचे उपजिल्हाध्यक्ष मुजम्मिल काजी
त्याचप्रमाणे गावातील हसीना हमदारे, अरमान ढालक, मुदस्सीर काझी, मुकद्दस काझी, आहद गोलंदाज, करीन गोलंदाज, नवनिर्मिती फाऊंडेशनचे अनिल जाधव आदी युवकांनी एकत्रित येऊन महामार्गावरील आज तीस ते चाळीस खड्डे भरले आहेत.
महामार्गावरील पडलेले खड्डे भरत असताना वाहनचालकांनी त्यांच्याबद्दल कौतुक व्यक्त केले आहे.
0 Comments