नाशिक : 15 ऑगस्ट पासून नाशिक शहरात सुरू झालेल्या "नो हल्मेट नो पेट्रोल " मोहिमेला नाशिक करांकडून वेगवेगळ्या पद्धतीने हरताळ फसला जात असल्याने आता शहर पोलिसांनी कडक कारवाई संदर्भात कंबर कसलीय.
अनेक वाहन चालक पेट्रोल पंपवर फक्त हेल्मेटचं जुगाड करुन पेट्रोल भरून घेतात. त्यानंतर हेल्मेट वापरत नाहीत. तर काही पेट्रोल पंप चालक देखील मोहिमेचे नियम पायदळी तुडवत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे.
नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते 15 ऑगस्टला या मोहिमेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
पण सलग पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी नो हेल्मेट, नो पेट्रोल या मोहिमेकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले आहे.
मोहिमेला नाशिक करांकडून वेगवेगळ्या पद्धतीने हरताळ फसला जात असल्याने आता शहर पोलिसांनी कडक कारवाई संदर्भात कंबर कसलीय अशी माहिती आमचे पत्रकार अनिकेत मशीदकर यांनी दिली.
0 Comments