खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

इटकुर मध्ये धुर फवारणी मोहीम डेंग्यूची साथ टाळण्यासाठी ग्राम पंचायतीची पूर्ण गावात उपाय योजना

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील इटकुर येथे डेंग्यूची साथ टाळण्यासाठी ग्राम पंचायतीने धुर फवारणी मोहीम राबवली आहे. 
गावामध्ये धुर् फवारणी अब्याटींग आणि तननाशक, या प्रकारच्या फवारण्या केल्या आहेत. त्यामुळे पुढील रोगावर नियंत्रण आणण्यासाठी या प्रकारच्या उपाय योजना केल्या आहेत. 

या फवारणी सोबत कळंब तालुका पंचायत समिती माझी उप-सभापती आणि सद्या कार्यरत असलेले ग्रामपंचायत चे कार्य सम्राट सदस्य लक्ष्मणकाका आडसुळ, गावचे सरपंच, व सर्व सदस्य मंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
डेंग्यूची साथ सुरुवात होत असलेल्या या गावात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्राम पंचायतीने गावातील सर्व गल्ल्या, रस्ते, नाल्या, सांड-पाण्याच्या ठिकाणी धूर फवारणी केली आहे. 

अगदी पावसाळ्याच्या ऋतु मध्ये कीटकजनन्याची मोठ्या प्रमाणात वाढ होते, त्यामुळे डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरिया, अशा प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते. 

त्यामुळे अशा धूर फवारणी मुळे या साथी आटोक्यात येऊ शकतात..!

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools