उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील ईटकुर या गावात तहसील कार्यालय पुरवठा विभाग कळंब आणि इटकुर गावातील रास्तधान्य दुकानदार यांच्या मदतीने गावातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले.
1] जीर्ण झालेल्या रेशन कार्ड दुय्यम प्रत मिळवणे.
2] नाव दुरुस्त करणे, मयत असलेले लाभधारकाची नावे वगळणे.
3] नवीन लाभ धारकांची नावे समाविष्ट करणे,
आदी कामे करण्यात आली.
यासाठी रास्त धान्य वितरण करणारे गुंडेराव गंभीरे, मोहन अडसूळ, अनिल गिरे, संतोष मोरे यांच्या मदतीने गावातील सर्व आलेले अर्ज पुरवठा विभाग कळंब यांच्या कडे सुपुर्द केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रांमपंचायतचे सन्माननीय सदस्य आणि कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
इटकुर गावातील रास्तधान्य दुकानदार यांच्या मदतीने गावातील अनेक प्रश्न मार्गी लावण्यात आले अशी माहिती पत्रकार अमोल रणदिवे यांनी दिली.
0 Comments