उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील इटकुर येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालय कळंब यांच्या सूचने नुसार इटकुर येथे सप्टेंबर माहचे उद्घाटन मोठ्या उत्साहात लहान बालकांसोबत अंगणवाडी सेविका यांच्यासह करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली या प्रसंगी दिप प्रज्वलन आंगणवाडी कार्यकर्ती उषा ओहाळ व सुलावति रणदिवे यांच्या हस्ते करण्यात आले.
तर प्रतीमेस पुष्पहार प्रभावती कुंभार व जयश्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, व लहान बालकांनी सूचना दर्शक फलके घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली.
या वेळी लहान मुलांनी कोरोनाचे काटेकोर पालन केले, या प्रभात फेरीस पार्वती कदम यांनी मोलाचे सहकार्य केले, कार्यक्रमाचे सूत्र संचालन संध्या रणदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिभा गंभीरे यांनी केले.
0 Comments