खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

दिव्यांग, वृध्द व निराधार यांचा शासन प्रशासन यांनी अंत पाहू नये - चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर

नांदेड : जिल्ह्य़ातील मुखेड येथे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली.
दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी शासन प्रशासन जागे करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी यांच्या मार्फत विभागीय आयुक्त, दिव्यांग आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करीत असताना मुखेड येथे पचायत समीती सभागृहात दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतरा़व डाकोरे पाटिल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.
या मेळाव्यात गटविकास अधिकारी मुखेड यांनी सभागृहात येऊन निवेदन स्वीकारले.

तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी गावातील घरकुल ग्रामंपचायत निधी, दिव्यागाना घरकुल,  ईत्यादी विषया बदल तोडी तक्रारी केल्या.
डाकोरे पाटिल यांनी निवेदनातील प्रश्नाचे उतर देण्यासाठी निवेदणातील खालील प्रश्न मांडले 

प्रश्न १:- मुखेड तालुक्यातील दिव्यांग एपची अंमलबजावणी कनिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी यांचे आदेशाची अंमलबजावणी केली नसल्यामुळे अनेक दिव्यांग वंचित राहात असल्याची खंत व्यक्त केली.

:- गटविकास अधिकारी यांनी मुखेड तालुक्यात १६६२ दिव्यांगाची अँपमध्य नोंदणी झाली त्यापैकी ६२७ दिव्यांगाना मंजुरी मिळाली.

४९ दिव्याग नामंजूर केले, ९८७ दिव्यांगाचे अर्धवट फार्म पुर्ण करण्याचे आदेश देऊन पुर्ण केले जातील.
प्रश्न २ :- दिव्यांग बांधवांचा ग्रामपंचायत व पचायत समितीचा पाच टक्के निधी का मिळत नाही? 

:- ग्रामपंचायत ला पंधराव्या निधीतून व स्वनिधीतून वाटप करण्याचे लेखी आदेश दिले जाईल.व पंचायत समिती चा पाच टक्के निधी अनुशेष दिला जाईल. 

प्रश्न ३ दिव्यांगाना घरकुल गावातील रिकाम्या जागेत मिळत नाही? 

 :- ज्या दिव्यांग बांधवांचे द्रारेषेत ब किंव्हा ड यादित नाव असेल त्यांना प्राधान्य क्रमाने घरकुल दिले जाईल, ज्या दिव्यांगाचे यादित नाव नसेल ते मागासवर्गीय असतील त्यांनी रमाई घरकुलचा प्रस्ताव पाठवा मंजुर केले जाईल.
 
प्रश्न ४ :-दिव्यांग वयोश्री साहित्य शिबिरातील साहित्य अध्याप वाटप होत नाही? 

वडजे :- तालुक्यात अकराशे दिव्यांग वयोवृध्द यांचे साहित्य आले पण त्या लाभार्थ्यांचा पुर्ण पता मोबाईल नंबर नसल्यामुळे वाटप करण्यात अडचण येत असल्याचे ऊतर मिळाले..

प्रश्न ५ :- दिव्यांग कायदा २०१६ ची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत पातळिवर अंमलबजावणी करण्याचे कश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले. 

अशा अकरा प्रश्नांची चर्चा मा गटविकास अधिकारी साहेब यांनी सर्व कार्यकर्त्यांसोबत केली व सर्व प्रश्न तात्काळ सोडविण्याचे आश्वासन दिले. 
डाकोरे पाटिल सहित सर्व शिष्टमंडळाने तहसिलदार साहेब मुखेड यांना निवेदन देण्यासाठी गेले असता तहसिलदार उपलब्ध नसल्याने नायब तहसीलदार, पुरवठा, संजय गांधी निराधार योजना अधिकारी यांना निवेदन देऊन खालील प्रश्नाला न्याय देण्यासाठी वरीष्ठाकडे निवेदन पाठवुन न्याय देण्याचे आश्वासन दिले. 

तहसील मार्फत मिळणारे अनुदान आठ दिवसांत देण्यात येईल, दिव्यांगाना स्वतंञ राषण कार्ड,, अशा अनेक मागण्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
 हा मेळ्याव्यात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
दिव्यांग, वृध्द निराधाराना  लोकप्रतिनिधी न्याय हक्क देत 
नसल्याने दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली बिलोली देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत  उमेदवार उभा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी ता अध्यक्ष आर एम कांबळे, रंजीत पाटिल, मगदुम शेख, दताञय सोनकांबळे, हनमंत हेळगिरे, हेमंत पाटील, पुडलिक जंगमवाड, मानसिंग वडजे, बाबु फुलाची, दिनेश हाके, सरोजना धारापुरे, रंजना, अंजना गायकवाड सोपान बिराजदार, बालाजी गवाले, यशोदा, सय्यद शादुल, महेबुब पठाण इत्यादी २२५  कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools