जिल्हा परिषद प्राथमिक (प्रशाला) येथे मुख्याध्यापक श्री पखाले यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ग्रापंचायत कार्यालय मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी गावच्या सरपंच मोहरताई कस्पटे व उपसरपंच विलास गाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिना निमित्त माहिती
आज ७२ वा हैद्राबाद मुक्ती संग्राम दिन, हैद्राबाद संस्थान भारतात सामिल करण्यासाठी ज्या ज्ञात -अजात हुतात्म्यांना आपले प्राण गमवावे लागले, अनेक स्वातंत्र्य सेनानिनां आतोनात हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. कित्येकांच्या घरादारांवर नांगर फिरले. अशा अशिम त्यागातून हैद्राबाद संस्थान मुक्त करणाऱ्या या नर -विरांना अभिवादन.
ब्रिटिश सरकारने जनतेच्या रेट्यामुळे भारताला स्वातंत्र्य देण्याचा कायदा केला. या कायदयानुसार १५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य देण्याचे निश्चित झाले. पण या स्वातंत्र्या कायद्यानुसार भारतात ६०० पेक्षा जास्त असलेल्या संस्थानिकांना स्वतंत्र राहण्याचा किंवा भारत किंवा पाकिस्तान या पैकी कोणत्याही राष्ट्रात सामिल होण्याचा अधिकार दिला होता. खरं तर देशाच्या एकात्मतेला व सुरक्षिततेला फार मोठा धोका होता. याची निकड लक्षात घेऊन स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व गृहमंत्री पोलादी पुरूष सरदार वल्लभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नातू बहुतेक संस्थाने भारतात सामिल करून घेतली. पण काश्मिर, जुनागड व हैद्राबाद ही संस्थाने सामिल झाली नव्हती.
सर्व संस्थानात हैद्राबाद हे संस्थान विस्ताराच्या बाबतीत सर्वात मोठे संस्थान होते. यामध्ये तेलंगणा, उत्तर कर्नाटक, मराठवाडा व खानदेशाचा काही भाग यात सामिल होता. स्वांतत्र्या पूर्वीच म्हणजे जून १९४७ मध्ये हैद्राबादच्या निजामाने आपले संस्थान स्वतंत्र राहण्याचे जाहिर केले. हैद्राबाद स्वतंत्र राहणे हे देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फारच धोकेदायक होते. याविरुद्धात संस्थानातील जनतेने प्रखर चळवळी केल्या. पण निजामाने या चळवळीनां दाद न देता दडपण्याचे काम केले. एवढेच नव्हे तर कासिम रझवीच्या रझाकार या स्वंयसेवक संघटनाच्या माध्यमातू संस्थानातील देशप्रेमी जनतेवर फार मोठे अत्याचार केले. यामध्ये हिंदूवर जसे अत्याचार केले,तसेच देशप्रेमी मुसलमानांना देखील त्यांनी सोडले नाही.
जनतेच्या रक्तरजिंत चळवळी व रझाकाराने केलेले अत्याचार याची भारत सरकारनी योग्य ती दखल घेऊन हैद्राबाद संस्थानावर पोलिस कारवाई करण्यात आली. १४ सप्टेंबर १९४८ रोजी हैहाबादच्या तीन बाजूने सैन्य घुसवण्यात आले. यावेळी निजामाच्या सैन्याने फारचा प्रतिकार केला नाही. अवघ्या चारच दिवसात सैनिक शरण आले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने हैद्राबाद संस्थान भारतात सामिल होत असल्याचे जाहिर केले. अशा रीतीने हुतात्म्याच्या बलीदानातून, स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागातून व जनतेच्या संघर्षातून हैद्राबाद संस्थान मुक्त झाले. म्हणूनच आपण हा दिवस दरवर्षी हैद्राबाद मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा करतो.
आज या दिनी आपल्या स्वतंत्र भारताच्या स्वराज्याचे सुराज्य बनविण्याचा, राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याचा आणि सर्वच क्षेत्रात भारत सुजलाम - सुफलाम बनविण्याचा संकल्प करुया; हैद्राबाद मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांचा सदिच्छा.
0 Comments