कैलासवासी कामगार नेते भारतीय कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष उल्हास म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त मुंबई मधील वेगवेगळ्या परिसरात 14 ऑक्टोबर रोजी नागरिकांना अन्नदान वाटप करण्यात आले.
यावेळी मा वृषालीताई उल्हास म्हात्रे अध्यक्षा यांच्या हस्ते वाटपास सुरूवात करून मा उर्मिला उल्हास म्हात्रे खजिनदार,अनिल पवार सरचिटणीस, कृष्णा गंगावणे सहसचिव, कु योगिता म्हात्रे यांनी अन्नदान वाटप कार्यक्रमाची रूपरेषा वाढवून नागरिकांपर्यंत अन्नदान पोहचवले.
अन्नदान वाटप कार्यक्रमास नंदू गंडले, किरण जगताप, सुनील पवार, अजय सारसर, अजय राजपूत, आकाश शर्मा यांचे सहकार्य मिळाले असे युनियन पदाधिकारी यांनी आमचे प्रतिनिधी यांना सांगितले.
कामगार नेते उल्हास म्हात्रे यांनी कामगारांसाठी न्यायासाठी आयुष्यभर भारतीय कामगार युनियन संघटनेच्या माध्यमातून गोर-गरीब जनतेसाठी सरकार शासनाविरोधात योग्य वेळी आंदोलन उपोषण करून कामगार बांधवाना न्याय मिळवून दिला, असे वक्तव्य कामगार नेते तसेच कार्यक्रमास उपस्थित सर्व कामगार बंधू-भगिणी यांनी न्यूज 24 खबर चॅनल प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले.
कामगार नेते उल्हास म्हात्रे यांच्या जयंतीनिमित्त न्यूज 24 खबर चॅनल वतीने विनम्र अभिवादन..
0 Comments