नांदेड - रयत क्रांती संघटनेकडुन मुखेड तहसील समोर सरकारच्या विरुध्द निर्दशने करुन केली जिआर ची होळी
केंद्र सरकार व राज्य सरकार विरुध्द प्रचंड घोषणाबाजी व जिआरची होळी करीत मागण्याचे तहसिलदारांना दिले निवेदन.
केंद्र सरकारने सोयाबीन ऊत्पादक शेतकरी विरोधी निर्णय तात्काळ माघे घेण्यात यावा.अशी मागणीही करण्यात आली.
सरकारने गुंठ्याला पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे 950 रुपये मदत द्यावी अन्यथा मंञ्याला जिल्ह्यात फीरु देणार नसल्याचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांचा
इशारा
नांदेड जिल्ह्यातील शेतकर्यांना सरसकट पिकविमा दिवाळीपुर्वी देण्याची केली मागणी
सातेगाव ता नायगांव येथील शेतकर्यांच्या तक्रारीचे पिक विम्याचे फार्म ऊसाच्या मळ्यात आढळुन आल्याने त्या दोषीवर कडक शासन करुन इफको टोकीयो पिकविमा कंपनीला काळ्या यादीत समाविष्ट करण्यात यावा.
वरील मागण्यासाठी तहसील समोर निदर्शने करीत जिआर ची होळी रयत क्रांती संघटनेकडुन करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे,
तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील तारदडकर, शहराध्यक्ष संगीत जाधव ऊमरदरीकर, गिरी पाटील केरुरकर, विनायक पा माहेगांवकर, दिगांबर बनबरे, प्रशांत देशमुख, दत्ता महाराज कमळेवाडीकर, ज्ञानेश्वर लुट्टे होकर्णेकर,
योगेश हातराळे सकनुरकर, पंढरी नोमुलवाड होडांळकर, बजरंग हिवराळे जांभळीकर, अजित वडजे, ज्ञानेश्वर पाटील वडगाव, बालाजी कदम माकणी, व्यकंट भायदे, सुर्याजी शिंदे, गुलाब देशमुख, नारायण देशमुख, श्यामराव देशमुख, चंद्रकात देशमुख यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते..
0 Comments