अहमदनगर - राहुरी फॅक्टरी येथे नगर-मनमाड मार्गावर गुंजाळ नाका परिसरात सोळुंकी यांच्या पेट्रोल पंपासमोरील मळीच्या गटारात गुरुवार 18 नोव्हेंबर रोजी सकाळी वयोवृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आला आहे.
नगर-मनमाड मार्गावरून एक व्यक्ती दुचाकीवरून जात असताना लघुशंकेसाठी थांबले असता मळीच्या गटारात एक वयोवृद्ध महिलेचा मृतदेह दिसून आला.
त्यांनी तातडीने सदर माहिती स्थानिक नगरसेवक आदिनाथ कराळे यांना दिली.
कराळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सदर मृतदेहाबाबत माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे व पोलीस हॅडकॉन्स्टेबल डी एन गर्जे यांना दिली. घटनास्थळी पोलीस दाखल होत आहे.
सदर महिला वेडसर असल्याची शक्यता असून रात्रीच्या वेळी जोराची धडक दिली असावी असे बोलले जात आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहे.
0 Comments