नांदेड - जिल्ह्यातील मुखेड येथे दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर, माजी आमदार हंनमतराव पाटिल बेटमोगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी बोर्डाचे अनावरण आणि मेळावा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार हनमंतराव पाटिल बेटमगरेकर मेळाव्याचे मार्गदर्शक दिव्यांग सस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरै पाटिल जिल्हाधक्ष ज्ञानेश्वर नवले, जिल्हा संपर्कप्रमुख नागोराव बंडे पाटिल यांचा शाल पुष्पहार घालुन सत्कार करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आला.
मा डाकोरे पाटिल यांनी दिव्याग बाधवानी संघटितपणे नांदेड जिल्ह्यात शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी 109 सनदशीर आंदोलन केल्यामुळे आज दिव्यांग बांधवाना गाव पातळीवर सवलती मिळत आहेत करिता गाव तिथ दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे शाखा स्थापन करून संघटितपणे संघर्ष केल्या शि़वाय न्याय मिळणार नाही.
दिव्यांगानी आपल्या शरीरातील व्यंग असल्यामुळे खचित न होता दिव्यांग बुध्दीने चातुर्य असुन त्या बुध्दी चा वापर करून दिव्यांग होने का गम नहि हम किसी से कम नही हे दाखविण्यासाठी संघर्षात सामिल होऊन आपला हक्क मिळवून घेण्यासाठी सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांनी संघटितपणे संघर्ष करून दिव्यांगाना मिळणाऱ्या चाळीस सवलती साठि गाव तेथे दिव्यांग संघटनेच्या शाखा स्थापन करून दिव्यांगाची शक्ती निर्माण करून कुंभकर्ण शासन प्रशासन खडबडून जागे करण्यासाठी बोर्डाचे स्थापना करावी असे आव्हान संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार हनमंतराव पाटिल यांनी दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी मी आपल्या पाठिशी असुन ग्रामपंचायत निधी व घरकुल ईत्यादी प्रश्न त्वरीत सोडविण्यासाठी सरपच ग्रामसेवक यांना सुचीत केले दिव्यांग बांधवांना कोणत्याही अडचणी असेल तर त्यांनी कोणत्याही वेळि मी आपल्या पाठिशी असल्याचे अश्वासन दिले.
कार्यक्रमास मुखेड तालुकाअध्यक्ष रामकिसन कांबळे, मानसिंग वडजे, शाखा प्रमुख पांडूरंग सुर्यवंशी, शाखा उपप्रमुख सुनिल चौधरी, शाखा सचिव बाबु फुलारी, शाखा सहसचिव बाबु कांबळे, शाखा कोषाध्यक्ष सलाम दौलताबादी तोटरे, नवले चापलवाड, देशमुख इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते..
0 Comments