राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात सुरु असलेली भाजी मंडई लवकरात लवकर स्थलांतरित करावी
अशी मागणी आरपीआयचे शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे यांनी केली.
निवेदनात असे म्हटले आहे की, राहुरी फॅक्टरी येथील आंबेडकर चौका मधील श्रीरामपूर रोड व तहाराबाद रोड या ठिकाणी चालू असणारे भाजी विक्रेते व अन्य व्यवसाय करणारे यांना देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मार्फत उपजीविकेसाठी पालिकेमार्फत स्वतंत्र जागा देण्यात यावी,
कारण या ठिकाणी येणारे जाणारे वाहतूक मोठ्या प्रमाणात असून कदाचित या ठिकाणी मोठा अनर्थ होऊ शकतो व भविष्यात या ठिकाणी कुठलीही जीवित हानी घडल्यास याला जबाबदार कोण असे या निवेदनात नमूद केले आहे.
सदर भाजी विक्रेत्यांना ५ तारखे पर्यंत पालिकेने जागा द्यावी नगर पालिकेने जागा नाही दिल्यास
आम्ही नगर पालिके समोर आरपीआय स्टाईलने आंदोलन करणार आहोत असे आरपीआयचे शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे यांनी सांगितले.
या वेळी RPI चे शहरध्यक्ष बाळासाहेब पडागळे, भीम तेजचे निलेश त्रिभुवन, रणजीत अमोलिक, दिपक सांगळे, दीपक चव्हाण, मच्छिंद्र पंडागळे, असलम शेख, प्रवीण पाळंदे गोरख खंडागळे आदी उपस्थित होते, अशी माहिती अहमदनगर प्रतिनिधी जालिंदर अल्हाट यांनी न्यूज 24 खबर ब्यूरो यांना सांगितली.
0 Comments