खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

कोरोना विधवे सोबत लग्न करून किशोर ढुस यांनी समाजासमोर आदर्श निर्माण केला - तहसिलदार फसीयोद्दीन शेख

राहुरी फॅक्टरी - दि. ५ डिसेंबर २१

कोरोना विधवे सोबत लग्न करून किशोरने समाजासमोर आदर्श निर्माण केला असे प्रतिपादन राहुरी चे  तहसिलदार फसीयोद्दीन शेख यांनी केले.

राहुरी अर्बन निधी संस्थेच्या वर्धापन दिन निमित्ताने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामभाऊ काळे  यांनी नऊ महिन्याचे बाळ असलेल्या आणि कोरोनामुळे विधवा झालेल्या महिले सोबत लग्न करणाऱ्या किशोर राजेंद्र ढुस याचा सपत्नीक सत्कार कार्यक्रमाचे आयोजन तहसीलदार शेख साहेब यांचे हस्ते ठेवला होता, त्या प्रसंगी तहसीलदार शेख साहेब बोलत होते. 

या प्रसंगी राहुरी अर्बन निधी संस्थेने किशोर ढुस व त्याची पत्नी यांचा साडी व कपडे भेट देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्या नऊ महिन्याच्या बालकाचे नावावर संस्थेने अकरा हजार रुपयांची मुदत ठेव ठेवली आणि ठेवीची पावती तालुका वास्तल्य समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार फसीयोद्दीन शेख यांचे हस्ते त्या बालकाचे हातात देऊन या जोडप्याचा सत्कार करण्यात आला.

सत्कार करताना तहशीलदारसाहेब यांचे सोबत मंचावर राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे, त्यांच्या पत्नी सौ कमल काळे, देवळाली हेल्प टीमचे अध्यक्ष दत्ता कडू पाटील, कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस व प्रशांत कराळे, योग प्रशिक्षक किशोर थोरात, सुप्रसिद्ध कीर्तनकार तथा भागवताचार्य ह भ प कु. आरती ताई शिंदे मुसमाडे सर आदी उपस्थित होते.
      
प्रसंगी बोलताना तहसीलदार फसीयोद्दीन शेख साहेब म्हणाले की, माझी तब्बेत ठीक नसल्याने व आज रविवार असल्याने घरातून  बाहेर कुठे जाण्याचा माझा अजिबात विचार नव्हता,

परंतु आप्पासाहेब ढुस यांचा फोन आला की, नऊ महिन्याचे बाळ असलेल्या कोरोना एकल महिलेशी माझे पुतण्याने विवाह करून तिला जगण्याची नवीन उमेद दिली, आधार दिला, तिचे खऱ्या अर्थाने पुनर्वसन केले आहे, त्यामुळे तुमचे हस्ते त्या जोडप्याचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

हे ऐकल्यावर माझी तब्बेत ठीक नसतानाही मी स्वतःला रोखू शकलो नाही. हे बोलताना तहशीलदार साहेब भावुक झाले होते, पुढे बोलताना ते म्हणाले की, कोरोनाने कित्येक कुटुंबावर संकट कोसळले आहे, कित्येक महिला विधवा झाल्या आहेत त्यांना शासन स्तरावर मदत देणेचे काम सुरू आहे,

पण आज किशोर ढुस याने जो आधार या एकल मुलीला मिळवून दिला त्याबद्दल त्याचे आभार मानावे तितके थोडेच आहे, किशोर ढुस यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणा देणारे असून कोणत्याही मदती पेक्ष्या आज कोरोना एकल महिलांना आधाराची गरज आहे.

आणि तो आधार किशोरने एका एकल महिलेला मिळवून दिला हे खूप मोठे धाडस असून सर्वांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी आणि अश्या महिलांना मदत करावी असे शेख साहेब यांनी शेवटी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools