राहुरी फॅक्टरी येथील तलाठी गवारे यांच्या रूम मध्ये भाडेकरू म्हणून गणेश लक्ष्मण तिटमे हा तरुण भाडेकरी म्हणून राहत होता.
हा तरुण अकोले तालुक्यातील निंब्राळ या गावचा असून तो राहुरी परिसरात मोलमजुरी चे काम करत होता.
मंगळवार दिनांक 28 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सुमारात गळफास घेतलेल्या अवस्थेत हा तरुण निदर्शनात आला.
गवारे तलाठी यांचा बंगला गुरुकुल येथे असून बंगल्याच्या खालच्या बाजूला एका रूममध्ये हा तरुण राहत होता.
सायंकाळी सहाच्या सुमारास गवारे कलाठी हे नगर आले असता हा तरुण फाशी घेतलेल्या अवस्थेत त्यांना हि बाब निदर्शनास आली.
तलाठी गवारे यांनी तातडीने ही बाब पोलीस हेडकॉन्स्टेबल दिनकर गर्जे यांना कळवली त्यानंतर लगेच घटनास्थळी पोलिस एस बी निकम, दीप्तीकार सय्यद, गणेश फाटके घटनास्थळी दाखल झाले आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही पुढील तपास पोलीस करत आहे.
0 Comments