अहमदनगर - राहुरी फॅक्टरी येथील गुरुवार दिनांक 16 डिसेंबर रोजी गुहा येथे रात्री आठ वाजता परराज्यातील साईभक्तांचा विचित्र अपघात झाला होता.
या अपघातातील जखमींवर उपचार करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी राहुरी फॅक्टरी येथील डॉक्टर रवींद्र वामन (ओकार हॉस्पीटल) यांच्याकडे आणले होते जे सर्व रुग्ण गंभीर स्वरूपात जखमी झाले होते.
त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले या उपचाराचा खर्च अव्वाच्या सव्वा आकारून पैसे दिले शिवाय कोणतीही जखमीला इथून जाऊ दिले जाणार नाही असा पवित्रा डॉक्टरांनी घेतल्याने देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक ज्ञानेश्वर वाणी यांनी या चारही जखमी रुग्णांचे १०००० रूपये बिल डॉक्टर वामन यांना ऑनलाइन द्वारे पेड केले.
परंतु पैशा अभावी जखमींना पुढील उपचारासाठी तात्काळ ठेवल्याने या जखमीं पैकी एक महिला नगर येथे उपचारासाठी नेत असताना मयत झाली आहे यास सर्वस्वी डॉक्टर वामन जबाबदार आहे.
या पूर्वीही डॉक्टर वामन यांनी पैशासाठी परराज्यातील रुग्णांना उपचारासाठी टाळाटाळ केली आहे वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरने मानवतेला काळीमा फासवलेली आलेली आहे.
तरी या हॉस्पिटल मधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन उपस्थित जखमींना मदत करणाऱ्या नागरिकांचे जबाब घेऊन संबंधित डॉक्टरवर कायदेशीर कारवाई असे निवेदनात दिले.
यावेळी भाऊसाहेब पगारे जिल्हाध्यक्ष (RPI अंबेडकर गट), ज्ञानेश्वर वाणी (नगरसेवक ) देवळाली प्रवरा, विक्रांत पंडित राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष राहुरी फॅक्टरी, कांतीलाल उल्हारे श्रीरामपूर तालुका सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस,
दादा वाणी, आशु सांगळे, शरद साळवे, शंकर धोत्रे, शरद वाळके आदी उपस्थित होते.
0 Comments