बारामती - एखादी चुकीची किंवा बेकायदा गोष्ट तुमच्यासाठी करावी किंवा ती करण्यात मदत करावी म्हणून अधिकाऱ्याचे मन बनविण्यासाठी त्याला दिलेली किंवा मागीतलेली रक्कम. यालाच लाच, चिरीमिरी, प्रलोभन असे म्हणतात अशाच एका गोष्टीसाठी बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनमध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या (Domestic Violence) गुन्ह्यात तक्रारदाराला अटक न करण्यासाठी व मदत करण्यासाठी
50 हजार रुपयाची लाचेची मागणी करुन तडजोडीत 40 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य करणाऱ्या दोन पोलिसांवर (Pune Rural Police) पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींनी 25 हजार रुपये रोख (Cash) आणि पोलीस चौकीसाठी प्रिंटर अंदाजे रक्कम 15 हजार अशी लाच मागितल्याचे पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांवर वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
४० हजारांच्या लाचेची मागणी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या 2 कर्मचारी यांनी 40 हजार रुपयांची लाच मगितल्याची एका व्यक्तीने तक्रार केली होती. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यातील २ पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये हवालदार शिवाजी सातव (वय ५२) व पोलिस नाईक गोपाळ जाधव (वय ३५) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार व त्याच्या कुटुंबियांविरोधात वडगाव पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक न करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी या दोघांनी लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे आली होती.
या तक्रारीची सत्यता तपासून पडताळणी केली असता या गुन्ह्याचा तपास गोपाळ जाधव यांच्याकडे असल्याचे दिसून आले. तक्रादारांना अटक न करण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी या दोघांनी त्यांच्याकडे २५ हजार रुपये व चौकीसाठी प्रिंटर घेण्यासाठी १५ हजार रुपये अशा ४० हजारांच्या लाचेची मागणी केली.
सदर कारवाई पोलिस अधिक्षक राजेश बनसोडे, अपर अधिक्षक सूरज सातव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
सर्वसामान्य नागरिकांची कामे करीत असताना प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून लोकांची आर्थिक पिळवणूक नेहमीच होत असते, लोकप्रतिनिधीं कडून जर अशा पदधतीने पैशाची मागणी होत असेल तर ते वैयक्तिक त्या व्यक्तीसाठी व खात्यासाठीही अपमानास्पद गोष्ट आहे.
0 Comments