बारामती - दि.२७. बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनने सव्वा वर्षांपासून फरारी असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.
भीमा बाजीराव डोके वय 22 वर्ष रा. धांदरफळ ता.संगमनेर जि.अहमदनगर याचा आरोपी अजय मलखान तामचीकर रा. धांदरफळ. ता. संगमनेर जि. अहमदनगर हा खून करून सव्वा वर्षांपासून फरारी होता.
संगमनेर पोलिस त्याचा शोध घेत होते परंतु तो मिळून आला नाही उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर यांना हा आरोपी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहत असल्याची माहिती मिळून आली.
सदर पथकाने वडगाव निंबाळकर येथे येऊन पोलीस मदत मागितली व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सोमनाथ लांडे सो. यांनी
सदर बाब गांभीर्याने घेऊन पो.स.ई.योगेश शेलार सो. तसेच पो.ना. नितीन बोराडे, पो.ना.अमोल भोसले, यांना संगमनेर पोलिस पथकास योग्य ती मदत करण्यासाठी सूचना दिल्या.
त्यानंतर पो.स.ई. योगेश शेलार, सो पो.ना.नितीन बोराडे, पो.ना. अमोल भोसले यांनी गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळवून सदर आरोपी राहत असलेल्या ठिकाणी गेले असता सदर आरोपी हा वाघळवाडी ता.बारामती जि.पुणे येथे राहण्यास असल्याबाबत माहिती मिळून आली.
सदर आरोपी राहत असलेल्या ठिकाणी गेले असता आरोपी अजय मलखान तामचीकर रा.धांदरफळ ता.संगमनेर जि. अहमदनगर हा पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत असताना त्यास पकडून उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर त्यांच्या तपास पथकाच्या ताब्यात देण्यात आले.
सदर कामगिरी स.पो.नि.सोमनाथ लांडे सो सहा. पोलिस निरीक्षक वडगांव निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.स.इ.योगेश शेलार सो, तसेच पो.ना.नितीन बोराडे, पो.ना.अमोल भोसले, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर यांच्या तपास पथकातील पो.हवा.लांडे, पो.ना.दातीर, पो.कॉ.बोडके, पो.कॉ.गाडेकर, पो.कॉ.शिंदे यांनी केली आहे.
0 Comments