बारामती - वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हददीत दिनांक – ११/०३/२०२२ रोजी रात्री ११.३० वा रो दिनांक १२/०२/२०२२ रोजीचे पहाटे ०५.०० वा चे दरम्यान मौजे कोर्हाळे बु ता बारामती जि पुणे
गावचे हदीतील बाबुराव माळशिकारे यांचे शेतात ऊसतोड कामगार झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्याचे संमतीशिवाय मुद्दाम लबाडीचे सर्वांचे कोपीत ठेवलेले २७,०००/- रु किमतीचे एकुण ०६ मोबाईल चोरुन नेलेले होते
त्यावरुन ऊसतोड़ टोळी मुकादम श्री सिध्दार्थ कडोबा वाघ रा टाकळे भिवडी ता भोकरदन जि.जालना सध्या रा मुढाळे ता बारामती जि.पुणे यांनी मोबाईल चोरीची फिर्याद दिल्याने
वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन गु.र.नं- ७० / २०२२ भा.द वि. ३७९ अन्वये दिनांक- १७/०२/२०२२ रोजी गुन्हा दाखल होवुन सदर गुन्हयाचा तपास पो ना ज्ञानेश्वर सानप यांचेकडे देणेत आलेला सदर गुन्हयाचे तपासात अनुषंगाने गोपनीय माहीती व तांत्रिक विश्लेषणातुन मिळालेल्या उपयुक्त माहीतीच्या आधारे सदर गुन्हयाचे तपासकामी
संशयित १) अमोल गोंडीराम मोरे वय २३ रा.भोकर ता.श्रीरामपुर जि अहमदनगर सध्या रा कोर्हाळे बु ता बारामती जि पुणे
२) दिपक एकनाथ बर्डे वय- १९ रा नेवासा ता नेवासा जि अहमदनगर सध्या रा कोहाळे बु ता बारामती जि पुणे
यांची सखोल व कसोशीने चौकशी केली असता वरील दोघांनी गुन्हा केला असल्याची कबुली दिलेली असुन आरोपी क १ व २ यांना सदर गुन्हयाचे तपास कामी अटक करुन दिनांक मा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सो बारामती यांचे कोर्टात हजर केले असता आरोपींना मा न्यायाधीश यांनी दिनाक- २१/०२/ २०२२ पर्यंत पोलीस कस्टडी मंजुर केलेली आहे..
सदर गुन्हयाचे तपासात चोरीस गेलेले एकुण २७,०००/- रु किमतीचे सर्व ०६ मोबाईल जप्त करणेत आलेले असुन या व्यतिरीक्त बरील आरोपी क-१ ते २ यांनी विधीसंघर्षग्रस्त बालक नामे ज्ञानेश्वर संताराम मोरे वय-१७ वर्ष ८ महीने याला सोबत घेवुन एकुण १२ मोबाईल चोरले असल्याची कबुली दिलेने आरोपींकडुन ६५,०००/- रु.जु वा कि.अ चे एकुण १२ मोबाईल जप्त करणेत आलेले आहे.
सदरची कामगिरी अभिनव देशमुख सा पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण, मिलींद मोहीते सो अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, मा श्री गणेश इंगळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग व अशोक शेळके सो. वरीष्ठ पोलीस निरीक्षक,
स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे स.पो.नि.सोमनाथ लांडे, तपासी अंमलदार पो.ना ज्ञानेश्वर सानप,
पो.ना.भाऊसाहेब मारकड तसेच पो.हवा /कोकरे, मोमीन स्था गु.शाखा यांनी केलेली आहे.
0 Comments