बारामती - तालुक्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे कोराळे येथील थोपटे वाडी येथील निलेश कर्वे या तरुणाचा अकस्मित मृत्यू झाला त्याचा मृतदेह अॅम्ब्युलन्स मधून घरी आणण्यात आला.
परंतु मृतदेह घरापर्यंत नेण्यास रस्ता नसल्याने कित्येक वेळ एम्बुलेंस मुख्य रस्त्यावर उभी होती.
काही दिवसापूर्वी हाच युवक घरी जाण्यासाठी रस्ता मिळावा म्हणून धडपडत होता त्याने वारंवार ग्रामपंचायत व इतर प्रशासकीय कार्यालयांमध्ये फेरा मारल्या होत्या व त्या संदर्भात कागदपत्रे सादर केली होती परंतु त्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद व रस्ता मिळाला नाही ही अत्यंत खेदजनक बाब आहे
पण योगायोगाने त्याचा मृत्यू होऊनही त्याच्या मागणीला व त्याला न्याय मिळाला नाही त्याचा मृत्यु झाला व त्याचा मृतदेह घरी आणल्यानंतर मृतदेह घरी आणण्यास रस्ता नसल्याने अडचणी निर्माण झाल्या सदर युवकाचा अंत्यविधी करण्यास खूप वेळ गेला यातूनच प्रशासनाचा ढिसाळ कारभार लक्षात येतो.
सदर घटनेत त्याच वेळी त्याचे कुटुंबीय स्थानिक नागरिक यांनी मृतदेह ॲम्बुलन्स रस्त्यावर थांबण्याचे ठरवले व रस्ता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह घरी न्यायचा नाही असे ठरवले परंतु सदर बाब वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनला कळविण्यात आली लागलीच वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सोमनाथ लांडे साहेब यांच्याकडे या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी तत्परतेने लक्ष घालून स्वता उपस्थित राहून ग्रामपंचायत व प्रशासनाकडून लेखी घेऊन संबंधित रस्ता मोकळा करून दिला व त्या युवकाचा मृतदेह घरी नेण्यात आला व पुढील विधी करण्यात आले.
एकंदरीतच वाड्या वस्त्यावरचे रस्ते व गावातील अंतर्गत रस्ते यावर विचार होणे गरजेचे आहे ही गोष्ट अधोरेखित होते याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे अशी एकूणच नागरिकांची अपेक्षा आहे.
0 Comments