बारामती - वडगाव निंबाळकर ता. बारामती येथिल प्राचीन विष्णु पंचायतन मंदीर नेहमी प्रमाणे सायंकाळी दिवाबत्ती केल्यानंतर मंदीर बंद केले होते.
दुसर्या दिवशी प्रथेप्रमाणे सकाळी पुजेसाठी स्थानिक पुजारी श्री राजेंद्र काकडे गेले असता गाभाऱ्याचे दार उघडे दिसले. व मंदिरातील साक्षात भगवंताची पंचधातुची प्राचीन मुर्ती चोरीला गेल्याचा अंदाज आला.आतील मुर्ती पंचधातुची होती व ती सुमारे शंभर वर्षापुर्वीची होती.
सोबत तांब्याची समई सुध्दा चोरी झाल्याचे लक्षात आले. राजेंद्र काकडे यांनी इतर नागरीकांना हि बातमी सांगुन घटनेची माहिती दिली,
तद् नंतर अजून एक पुजारी हेमंत गणेश बोकिल यांनी वडगांव निंबाळकर पोलिस स्टेशन मध्ये सदर घटनेची माहिती देत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात तक्रार दिली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री विष्णु भगवंताची अंदाजे पाच ते सहा किलो वजनाची दिड फुट उंचीची सुमारे 12000 रूपये किमतीची पंचधातुची मुर्ती व एक फुट उंचीची पितळी समई अंदाजे किंमत 500 रूपये असा एकूण 12500 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
पुढिल तपास पोलीस हवालदार श्री फणसे करत आहेत; परंतू परिसरातील मागील काही दिवसात इतर ठिकाणी घडलेल्या मंदिरातील घंटा चोरी, दान पेट्या चोरी अशा घटनाबाबत भावीकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत.
0 Comments