बारामती - ऊस पिकातुन चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी आधुनिक शेती पद्धतीची माहिती जाणून घेण्याबरोबर संतुलित खत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे
यासाठी शेतकऱ्यांनी नव्याने बाजारात आलेले महाधन क्रॉपटेक 9:24:24 या अनलॉक टेक्नॉलॉजी वापरावी अशी माहिती महाधनचे झोनल मार्केटिंग मॅनेजर श्री बिपिन चोरगे यांनी दिली.
महाधन तर्फे वाणेवाडी मध्ये शेतकरी मेळावा नुकताच पार पडला. यामध्ये ऊस पिकासाठी विशेष उपाय म्हणून उत्पादनाबद्दल माहिती सांगण्यात आली.
अनलॉक टेक्नॉलॉजी वापरातुन ऊस पिकाच्या खतावरील खर्च १०% कमी होतो. उसाच्या दोन पेरीतील अंतर वाढते व कांडीची जाडी वाढते. तोडणे योग्य ऊस 5% ने वाढतात.
ऊस उत्पादनात १०% वाढ होते. जमिनीचे आरोग्य सुधारते
बाजारात खतांची उपलब्धते बद्दल माहिती श्री सुधाकर जगदाले (एरिया मार्केटिंग मॅनेजर) यांनी दिली
माती परीक्षण करून पिकाला खताची मात्रा द्यावी व माती परीक्षणाचे फायदे श्री रवींद्र वाघमोडे (फिल्ड सेल्स मॅनेजर) यांनी दिली.
या वेळेस सोमेश्वर साखर कारखान्याचे माजी संचालक श्री किशोर धर्मराज भोसले, बारामती खरेदी विक्री संघाचे संचालक बाबा तात्या भोसले, श्रीविठ्ठल विकास सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन श्री अभय चव्हाण, प्रगतशील शेतकरी नारायण भिकोबा भोसले, मोहन आप्पा यादव, पोपटराव भोसले, महाधन चे उपविक्रेते स्वयंभू कृषी सेवा केंद्र काकडे आदी मान्यवरांसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन आप्पासाहेब भिसे यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीचा ऊस पिकासाठी चांगला उपयोग होईल आणि अधिकचा नफा घेता येईल अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
0 Comments