खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

मनमाड विभागाचे उपअधीक्षक समीरसिंह द्वारकोजीराव साळवे, राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित

मनमाड - विभागाचे पोलिस उपअधीक्षक समिरसिंह साळवे यांना राष्ट्रपती शौर्य पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले. सोमवारी दुपारी मुंबईत राजभवन येथे झालेल्या सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी साळवे यांचा पदक बहाल करत गौरव केला.
जिल्हा पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांना २०२० मध्ये राष्ट्रपती शौर्यपदक जाहीर झाले होते. 

गडचिरोली भागात तीन वर्षे कार्यरत असताना त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. 
ऑगस्ट २०१९ मध्ये त्यांनी नक्षलविरोधी अभियान योग्यप्रकारे राबविले होते. 

छत्तीसगड व महाराष्ट्राच्या सीमेवरील अबूजमाड या घनदाट जंगलात दोघा नक्षलवाद्यांचा त्यांनी खात्मा केला होता. वयाच्या २७ व्या वर्षी केलेल्या एन्काउंटरच्या धाडसी कामगिरीची दखल घेत त्यांची पदकासाठी निवड झाली होती.
तीन वर्षांपासून मनमाड विभागाची यशस्वी कमान सांभाळणारे साळवे पोलिस महासंचालक पदकानेही सन्मानित झाले आहेत. साळवे यांच्या सन्मानाचे पोलिस दलातून कौतुक केले जात आहे.

मुंबई येथे राजभवनात पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे व आयुक्तालयातील उपनिरीक्षक मेहबूब अली जियाउद्दीन सय्यद यांना यांना राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित केले.

सय्यद यांना ३३ वर्षांच्या सेवेत ३६४ बक्षिसे आणि पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. सय्यद यांनी पंचवटी, भद्रकाली, सरकारवाडा पोलिस ठाण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

सुशीलकुमार अडागळे 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools