बारामती : सुपे ता. बारामती पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची थकीतबाकीच्या कर्जाची नोटीस दिल्याच्या कारणावरून सुप्याच्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बँकेतच मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपी अभिनय उर्फ काका कुतवल (रा.सुपा, ता.बारामती, जि.पुणे ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दत्तात्रय पाडूंरंग कदम, व्यवसाय नोकरी (पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक. रा.माळेगाव बुद्रुक, ता.बारामती, जि. पुणे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपींचे कुतवळ यांचे नातलग सागर कुतवळ यांना सोनेतारण थकीत कर्ज प्रकरणी २९ रोजी नोटीस बजावण्यासाठी मोरगाव येथे गेले असता, तेथून ते परत येत असताना त्यांना कुतवळ यांनी फोन करत काहीही कारण नसताना शिविगाळ केली.
तुम्ही शिविगाळ का करता अशी विचारणा फिर्यादीने केली असताना त्यांनी तु बँकेत ये, तुझ्याकडे बघतो असे म्हणत फोन ठेवून दिला.
दुपारच्या सुमारास फिर्यादी बँकेत आले असता, त्यांनी काही एक न विचारता शिविगाळ केली. हाताने मारहाण करत हाताची बोटे पिरगाळत खुर्चीवर ढकलून दिले. फिर्यादी खाली पडल्यानंतर खुर्चीने मारहाण सुरु केली. त्यात फिर्यादीच्या हाताची करंगळी फ्रॅक्चर झाली.
त्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल वरिष्ठांना कल्पना दिली. असे फिर्यादींनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे अधिक तपास करीत आहेत.
0 Comments