या निमित्ताने बहुजन हक्क परिषद बारामती तालुका आणि रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमानाने दहावीच्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी बहुजन हक्क परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे युवक अध्यक्ष पै नानासाहेब मदने, तालुका युवक अध्यक्ष अमोल गायकवाड,
रायझिंग स्टार इंग्लिश मिडीयम स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष कांचन काटे उपाध्यक्ष माधव काटे वडगाव निंबाळकर ग्रामपंचायतीचे सदस्य संजय साळवे,
अजित भोसले युवा उद्योजक सौरभ दरेकर, नंदुशेठ जाधव, पांडुरंग घळगे, दादासाहेब निंबाळकर, चेतन साळवे, डॉ.सतिश गावडे, पांडुरंग पवार, श्रीनाथ मंडप व डेकोरेशनचे मालक भुपेंद्र आगम, निलेश साळवे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वडगाव निंबाळकर येथिल परीक्षा केंद्र क्र.1345 मध्ये एकुण विद्यार्थी 85 असुन उपकेंद्र कोराळे खुर्द, कोराळे बुद्रुक, मुढाळे, ढाकाळे, लाटे माळवाडी या ठिकाणी 342 विद्यार्थी परीक्षा देत असल्याची माहिती स्वातंत्र्य विद्या मंदीरचे प्राचार्य बनकर यांनी दिली.
या कार्यक्रमाचे आयोजन बहुजन हक्क परिषदेचे बारामती तालुक्याचे युवक अध्यक्ष अमोल गायकवाड यांनी केले होते.
0 Comments