अहमदनगर - राहुरी तालुक्यात ठिकठिकाणी बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
सर्व धर्म समभाव, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मूलमंत्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला
याचे प्रतीक म्हणून राहुरी फॅक्टरी प्रसाद नगर भागातील सर्व जाती-धर्माचे बांधवांनी एकत्र येऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली .
सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज पठण केल्या नंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले .
या प्रसंगी शिवचरित्रकार सय्यद यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपले मनोगत व्यक्त केले .
या कार्यक्रम प्रसंगी सर्व धर्मीय बांधव एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराची 131 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.
भिम सैनिक एकत्र येऊन या मध्ये सामाजिक कार्यकर्ते शरदरावजी साळवे, दिलीपराव धिवर, आसाराम अल्हाट, RPI आठवले गटाचे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे, सलीमभाई शेख, शहाबाद पठाण, किरण नरोडे, बंटी लोंढे, अनील पवार, बबन राव, निमसे पाटील आदी भीमसैनिक कार्यक्रमाला उपस्थित होते.
0 Comments