बारामती - कोऱ्हाळे बु.तालुका, बारामती
श्री सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये "आनंद बाजार" उत्साहात साजरा
शनिवार ,दिनांक २३/०४/२०२२ रोजी शाळेमध्ये आनंद बाजार साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रप्रमुख माननीय श्री.संपत जरांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच, श्री सिद्धेश्वर प्रतिष्ठान चे अध्यक्ष राहुल भगत, श्री सिद्धेश्वर पब्लिक स्कूल कोऱ्हाळे बुद्रुक ता. बारामतीचे अध्यक्ष दत्तात्रय माळशिकारे, श्री सिद्धेश्वर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भोसले, श्री सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चे व्यवस्थापक साळुंखे व इतर शिक्षक देखील उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी विविध खाऊचे पदार्थ, पालेभाज्या, शालेय साहित्य, थंडपेय, अशा अनेक इतर गोष्टी आणल्या होत्या विद्यार्थ्यांनी त्या पदार्थांची व्यवस्थितपणे विक्री केली.
आनंद बाजार घेण्यामागचे उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान मिळाले पाहिजे, त्यांना पैशांची देवाण घेवाण समजावी व ती जोपासली जावी .
सर्व विद्यार्थी या कार्यक्रमात आनंदाने सहभागी झाले आणि हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
0 Comments