पुणे - बारामती येथील मोराळवाडी ता.बारामती माझ्याशी लग्न कर नाहितर मी तुझ्या सासरी येवून आत्महत्या करेन,
आमच्या मुलाशी लग्न कर नाहितर तो मरून जाईल,
अशा धमक्यांना कंटाळून एका विवाहीत महीलेची आत्महत्या.
माझ्याबरोबर लग्न कर, अन्यथा तुझ्यावर बलात्कार करेन, तुझ्या सासरी येवून तुझ्या नवऱ्याच्या घरी येऊन फाशी घेऊन आत्महत्या करेन अशी धमकी दिल्याने एका विवाहितेने विष पिऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यातील मोराळवाडी या गावात घडला असून,उपचारादरम्यान विवाहितेचा मृत्यू झाला.
या प्रकरणी विवाहितेचे वडील भानुदास लक्ष्मण कारंडे, रा.कारंडेमळा, मोराळवाडी ता.बारामती, जि.पुणे यांनी फिर्याद दिली असून, संशयित आरोपी आकाश मुरलीधर कारंडे, उज्वला मुरलीधर कारंडे, मुरलीधर कुंडलिक कारंडे यांच्यावर भा.द.वि कलम ३०५,५०६ (३४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील आरोपीना ताब्यात घेतले असून, या गुन्ह्याचा अधिक तपास वडगाव निंबाळकरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री सोमनाथ लांडे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक सलिम शेख हे करीत आहेत.
0 Comments