खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

महाराष्ट्र लोकसेवा आयोग व स्पर्धा परीक्षा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ

बारामती - वडगाव निंबाळकर ता.बारामती: बहुजन हक्क परिषद महाराष्ट्र राज्य युवक अध्यक्ष श्री नानासाहेब मदने यांच्या पुढाकाराने वडगाव निंबाळकर ता.बारामती येथे तालुक्यातील स्पर्धा परीक्षेत यश मिळवणा-यांचा
सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी विनोद ताराचंद चव्हाण (सहायक मोटार वाहन निरीक्षक), माधुरी दशरथ जाधव,  निलेश बाळासो पोमणे,
सुरज सुरेश मोरे ( तिघे ही पोलीस उपनिरीक्षक) यांचा शाल श्रीफळ देऊन माजी महसूल आयुक्त शिवाजीराजे राजेनिंबाळकर व बहुजन हक्क परिषद संस्थापक अध्यक्ष सुनील धिवार, तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे स्वागत युवक अध्यक्ष अमोल गायकवाड व जिल्हाध्यक्ष संतोष डुबल यांनी केले.
सूत्रसंचालन अभिजीत हिरवे सर यांनी केले तर
आभार पैलवान नानासाहेब मदने यांनी मानले.
या वेळी सुजाता जाधव,कांचन काटे, संजय साळवे, अजित भोसले, दत्तात्रय खोमणे, भाऊसाहेब खंडागळे, सतिश साळवे, सचिन साठे, बाळासो जाधव, धनंजय खोमणे, सुरज खोमणे, निलेश मदने, नितिन गायकवाड, तेजश्री भंडलकर, पांडुरंग घळगे, नंदकुमार जाधव,दादासाहेब निंबाळकर, नागेश जाधव, तेजस जाधव, भाऊसो आगम, आकाश वाघमारे, अभिजित साळवे, मंगेश खोमणे, चांगदेव भंडलकर उपस्थित होते.
सर्व सामान्य कुटुंबातील मुलांनी स्पर्धा परीक्षेत मिळावलेले यश इतरांसाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांनी काढले.

तर स्पर्धा परीक्षेत यश मिळवणा-या युवकांचा सत्कार करुन सामाजिक बांधिलकी जोपासली.त्यांच्यासारखे यश इतरांनी मिळवावे हा हेतू सत्कारा मागचा होता. असे मत श्री नानासाहेब मदने- बहुजन हक्क परिषद युवक अध्यक्ष महाराष्ट्र यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools