कळंब - ईटकूर - ५ जुन जागतिक पर्यावरण दिना निमित्त ईटकूर ग्रामपंचायतच्या वतीने जिल्हा परिषद प्रशालेत सरपंच मोहराताई कसपटे, उपसरपंच विलास आप्पा गाडे, महत्मागांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष राजाराम आडसुळ, उपाध्यक्ष भारत जाधव, सा. दै . देशभक्त संपादक लक्ष्मण शिंदे - पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस प्रदिपभैय्या फरताडे, रोजगार सेवक सचिन गंभीरे, ग्रामविकास अधिकारी ए .बी . शेख, आदिंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .
जगतिक पर्यावरण दिनी १८००० वृक्ष लागवडीचा ग्रापचा संकल्प
यावेळी ग्रामपंचायतच्या वतीने विविध जातींच्या एकूण १८००० वृक्षांच्या लागवडीचा संकल्प करण्यात आला असुन यामध्ये लोकवाट्यामधुन ५००, बिहार पॅटर्न २०००, वैयक्तीक शेतकरी १५५०० अशा प्रकारे ग्रा प पुढाकार घेवून, नागरीकांत जनजागृती करून, वृक्षांचे महत्त्व पटवून देवून हा वृक्ष लागवडीचा प्रकल्प यशस्वी राबविण्यासाठी कामाला लागल्याचे दिसुन येत आहे.
0 Comments