कळंब दि. २८ऑगस्ट २०२२ रोजी साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंती निमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी पी.आय.पिलंगवाड, जाधव, वाघमोडे यांनी मिरवणुकीचे उद्घाटन केले.
ग्रा.पं सदस्य विनोद राजेंद्र चव्हाण, भाग्यवंत मोरे, विलास मोरे, मनोहर चव्हाण, संतोष शिंदे, सुखदेव शिंदे, हौसेराव शिंदे, सचीन शिंदे, भाऊसाहेब मोरे, श्रीकांत चव्हाण
तसेच जयंती कमिटीचे अध्यक्ष अभीषेक चव्हाण, उपाध्यक्ष रुतीक शिंदे, कोषाध्यक्ष अजय चव्हाण, राहुल कांबळे, कॄष्णा मोरे, शिवाजी कसबे,
धनंजयभाऊ मोरे-संस्थापक अध्यक्ष आझाद क्रांती सेना, व श्रेयसभाऊ मोरे संगठन प्रमुख आझाद क्रांती सेना यांच्या हस्ते साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी प्रतीमेचे पुजन करुन मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.
साठे नगर समाज मंदिर, बाजार मैदान मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भिमनगर-साठेनगर असा मिरवणुकीचा मार्ग होता,
भीमनगर येथे दै.देशभक्तचे संपादक लक्ष्मण शिंदे, आदर्श शिक्षक तुकाराम शिंदे, कोतवाल सौ.सरीता विनोद चव्हाण व ग्रा.पं.सदस्या सौ.रेखाताई शिंदे यांनी प्रतीमेचे पुजन केले,
मिरवणुकीस साठे नगर-भीमनगर येथील समाजबांधव तसेच नॉलेजविंग्ज डिजिटल एज्युकेशन जिल्हा व्यवस्थापक संतोष मोरे, पत्रकार सुधाकर रणदिवे, अमोल रणदिवे व गावातील ग्रामस्थांथांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला
मिरवणुकीचे आयोजन साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे जयंती समीती ईटकुर व साठे नगर व भीमनगर येथील युवकांनी केले होते.
0 Comments