पालघर - विक्रमगड तालुक्यातील गुरवपाडा (सवादे) या शाळेत शनिवारी लायन्स क्लब ऑफ मुंबई मॅजेस्टिक मुलुंड अँड लायन्स क्लब ऑफ मुलुंड नॉर्थ स्टार यांच्या तर्फे शाळेला दोन संगणक वाटप करण्यात आले
शाळेतील मुलांचे व गुरवपाडा गावातील पालकांचे डोळे मोफत तपासणी शिबीरात तपासून घेण्यात आली.
या वेळी ज्यांना डोळ्यांना दोष आहेत अशा विद्यार्थी व पालकांना साठ (60) चष्म्याची वाटप करण्यात आली
तसेच मुलांना खाऊ व इकोफ्रेंडली पिशव्या आणि इतर साहित्य देण्यात आले
यावेळी लायन्स क्लब चे सेक्रेटरी यशवंत सुर्वे, आर्किटेक्ट दिलीप देशमुख यांनी मुलांना मार्गदर्शन केले
लायन्स क्लबचे निलेश फुटाणे, डायरेक्टर अजय देवकर, अमोल कांबळे उपस्थित होते
गुरवपाडा शाळेचे मुख्याध्यापक केशव भोये यांनी लायन्स क्लब टीम चे विशेष आभार मानले
या कार्यक्रमाला शिक्षक दशरथ धुमाळ,सुरेश भांड व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अंकुश गुरव व ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.
0 Comments