कळंब - पुरुष हा मुळातच भटकंती करणारा,या विपरीत स्त्री ही एका ठिकाणी स्थिर राहणारी, ही स्त्रीच जगातील अनेक शोधांची जननी. खऱ्या अर्थाने स्त्री हीच पहिली संशोधक, तीच पहिली डॉक्टर, तीच पहिली अभियंता, स्त्री हीच पहिली डीझाईनर. आजही प्रत्येक स्त्रीच्या व्यक्तिमत्वात या आणि अशा अनेक कला गुणांचा अंतर्भाव दिसून येतो.
गौरी महालक्ष्मीचा सण म्हणजे स्त्रियांच्या या सर्व क्षमतांचे दर्शन घडवणारच.प्रचंड मेहनत घेऊन एका रात्रीत आख्ख्या संसाराचे दर्शन घडविण्याचे अभुतपुर्व काम प्रत्येकाच्या घरातील महिला लीलया करून दाखवतात.महिलांच्या या मेहनत व कल्पकतेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सलाम.
आपल्या कळंब शहर व ग्रामीण स्त्रियां च्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांनी उंभऱ्याच्या आत तयार केलेले सजावटीचे हे देखावे जगाच्या व्यासपीठावर आणावे.
त्यांचा सत्कार सन्मान व्हावा या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कळंब खास कळंब शहर व कळंब ग्रामिण भागातील महिलांसाठी गौरी महालक्ष्मी सजावट स्पर्धा (ऑनलाईन) आयोजित करत आहे.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कळंबच्या वतीने भेट स्वरूपात एक आकर्षक भेट वस्तु देण्यात येणार आहे तसेच सर्वात आकर्षक सजावट करणाऱ्या ग्रामीण व शहर भागातुन प्रत्येकी तीन महिलांना पैठणी (एकुण सहा),तीन महिलांना चांदीचा गणपती(एकुण सहा) व तीन महिलांना पैठणी (एकुण सहा)भेट करण्यात येणार आहे. (शहरातून ९ स्पर्धक व ग्रामीण भागातुन ९ सर्वोत्तम स्पर्धकांची निवड केली जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्याकरिता आपण आपल्या गौरी महालक्ष्मी सजावटीचे दोन फोटो तसेच आपले संपूर्ण नाव,
पत्ता,संपर्क क्रमांक कार्यालय या 8788051266 या व्हाट्सअप नंबर वर दिनांक 06/09/2022 पर्यंत पाठवावे असे आवाहन तालुकाध्यक्ष प्रा.श्रीधर भवर यांनी केले आहे.
0 Comments