उस्मानाबाद - (गडदेवदरी परिसर) जगाला बुद्ध धम्माची गरज आहे, तथागत बुद्ध व सम्राट अशोक काळापासून चालत आलेली आपली संस्कृती पुढे घेऊन जाणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीला समर्पित होऊन आपण सर्वांनी भिख्खू संघाच्या मार्ग दर्शनात धम्म चळवळ गतीमान करायला हवी असे आवाहन पूज्य भंते पयानंद थेरो यांनी केले .
"तगर भूमी" बुद्ध विहार, गडदेवदरी परीसर उस्मानाबाद येथे भन्ते सुमेधजी नागसेन यांच्या मार्गदर्शनाखाली दि.११ सप्टेंबर २०२२ रोजी येथे पूज्यनिय भिख्खू संघाच्या प्रमुख उपस्थिती मध्ये वर्षावास महोत्सव संपन्न झाला.
या कार्यक्रमास पूज्य भंते महाविरो थेरो ( काळेगाव ) पूज्य भंते पयानंद थेरो ( लातूर ) यांची प्रमुख धम्म देसणा झाली.
तथागत बुद्धांच्या विचारानेच आध्यात्मिक सुखाची प्राप्ती होते , बुद्धांनी मनुष्यास सुखाने जगण्याची शिकवन दिली. बुद्ध धम्माचे संस्कार केंद्र तगर भूमी येथे निर्माण होत आहे , उस्मानाबाद जिल्ह्य़ातील सर्वांना धम्मा कडे घेऊन जायचे असेल तर धम्म संस्कार केंद्र निर्माण होणे हि काळाची गरज आहे असे मनोगत पूज्य भंते महाविरो थेरो ( काळेगाव ) यांनी व्यक्त केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रविण रनबागूल यांनी "तगर भूमी" बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी रोख पन्नास हजार रूपयांचे अर्थिक दान दिले तसेच कळंब तालुक्यातील उपासक विठ्ठल समुद्रे व उपासक नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांनी प्रत्येकी दहा हजार रूपये विहारासाठी दान दिले.
या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व उपासकांना कुरणे नगर व झेंडे नगर यांच्या वतीने भोजन दानाची उत्तम व्यवस्था केली.
हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून आयु.पि.एम.सोनटक्के, महेंद्र चंदनशिवे, कैलास शिंदे, पृथ्वीराज चिलवंत, स्वप्निल शिंगाडे, नवज्योत शिंगाडे, निखिल बनसोडे, समाधान गायकवाड, समाधान जोगदंड, सतीश खांडके, सुखदेव म्हस्के, संपत शिंदे, आकाश वाघमारे, सुनिल डावकरे, हर्षद सोनटक्के, राहुल सोनटक्के, गौतम आंबेवाडीकर, बि.आर.ढगे, तुषार शिंदे, बालाजी अल्टे, रमेश कांबळे, मनोज आवचारे, मयूर अंकुश, रामजी कांबळे यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास सा.साक्षी पावनज्योतचे संपादक सुभाष द.घोडके, प्रा.राजा जगताप, अक्षय डांगे, सुमित डाके, अनिल हजारे आदींसह परिसरातील ५०० च्या वर उपासक उपसिकांनी धम्मदेसनेचा लाभ घेतला.
0 Comments