कळंब - एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कळंब व बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ईटकुर बीट अंगणवाडीमध्ये १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पोषण महा सप्ताह साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला ईटकुर बीट च्या पर्यवेक्षिका संगीता सावंत उपस्थित होत्या. यावेळी गावचे ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कस्पटे, विनोद चव्हाण, दैनिक देशभक्त चे संपादक लक्ष्मण शिंदे, या कार्यक्रमाला उपस्थित होते .
ईटकुर बीट च्या पर्यवेक्षिका संगीता सावंत यांनी उपस्थित स्तंनदा माता व गरोदर माता तसेच किशोरवयीन मुली यांना पोषण व कुपोषण या संदर्भात माहिती दिली तसेच गरोदर माता स्तनदा माता यांनी सकस आहार कसा घेतला पाहिजे हे प्रत्यक्षकेद्वारे दाखवून दिले.
सकस आहार घेतल्याने सुदृढ बालक जन्माला येईल व त्यामुळे कुपोषण थांबेल असे उपस्थित महिलांना सांगितले.
या सप्ताहाच्या निमित्ताने पोषण पाककृती कार्यक्रम घेण्यात आला .
यावेळी गावातील अंगणवाडी सेविका व महिलांनी विविध पोषण पाककृती बनवून आणल्या होत्या.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका कस्तुरबाइ अस्वले, सुनिता रणदिवे, आम्रपाली शिंदे, प्रभावती कुंभार, सुलावती रणदिवे, संगीता फरताडे, उषा ओव्हाळ, पल्लवी लोंढे, संध्या रणदिवे, कौशल्य कदम, अश्विनी शिंदे, अनिता शिंदे, कोमल कदम, प्रतिभा गंभीरे, यांचे सहकार्य लाभले.
0 Comments