खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

आंबेडकरी जनतेने आज शहरामध्ये निळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला - एड. भाई विवेक चव्हाण

उस्मानाबाद - येथील आंबेडकरी जनतेने आज शहरामध्ये निळ्या झेंड्याखाली एकत्र येऊन उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला

जिल्हाधिकारी यांनी एक महिन्याच्या आत कानेगाव येथील बौद्ध समाजास नियोजित जागा देण्यात येईल असे ठामपणे सांगितले. 
तळवडे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या शाळेत मुक्काम केला होता त्याच ठिकाणी केले जाईल शाळा हस्तांतर करण्यासाठी येत्या दोन महिन्यात प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे आश्वासित केले. 

तुळजापूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याचे काम येत्या दोन महिन्यात सुरू होईल असे ठामपणे सांगितले .

इतर मागण्या संदर्भात संबंधित विभागा बरोबर सर्व समवेत चर्चा करू असे आश्वासित केले बऱ्याच दिवसांनी निघालेल्या या मोर्चात शेकडो आंबेडकरी जनता सहभागी झाली होती.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकताच त्याचे सभेमध्ये रूपांतर झाले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालया समोरील रस्त्यावरील वाहतूक तब्बल २ तास वनवे करण्यात आली.

या मोर्चाचा प्रारंभ भीमनगर येथील क्रांती चौकातून करण्यात आला. हा मोर्चा त्रिसरण चौकात आल्यानंतर तेथे सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. तर पोस्ट ऑफिस मार्गे संत गाडगेबाबा चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

तेर व वडगाव परिसरात पुरातत्त्व विभागकडून उत्खनन करून बौद्ध प्रतीके भारतातील बुद्ध प्रेमी, अभ्यासक व पर्यटकांना पाहण्यासाठी खुली करावीत, डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रातील प्रांगणात डॉ आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा. 

तसेच तुळजापूर शहरात डॉ आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची कारवाई तत्काळ करण्यात यावी, 

उस्मानाबाद येथे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे. तसेच आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्या लगत असलेले‌ रेल्वे तिकीट घर परिसरातील रिकाम्या जागेत शहरातील सर्व नागरिकांच्या उपयोगात येईल असे उद्यान निर्माण करण्यात यावे या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. 

फुले शाहू आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था अंतर्गत या मोर्चाचे नियोजन करण्यात आले.

यावेळी भीम आर्मीचे प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे, कीर्ती पाल गायकवाड, पृथ्वीराज चिलवंत, विजय बनसोडे, सोमनाथ गायकवाड, मेसा जानराव, आदिनाथ सरवदे, विशाल शिंगाडे, प्रशांत बनसोडे, पुष्पकांत माळाळे, भाई फुलचंद गायकवाड, जयशिल भालेराव, बाबासाहेब बनसोडे, अशोक कांबळे, गणेश वाघमारे कल्याणराव माने वसंत दादा देडे सिद्धार्थ गवळी आदीसह बौद्ध महिला व बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते..

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools