खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; यावेळी दोन विषय महत्त्वाचे ठरले ते म्हणजे

डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न; यावेळी दोन विषय महत्त्वाचे ठरले ते म्हणजे सभासद व कामगार यांची देणी देण्यात यावी; व कारखान्याच्या जमिनी विक्री करण्यासंदर्भात हे दोन मुद्दे महत्त्वाचे ठरले

अहमदनगर - डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 30 सप्टेंबर रोजी कारखान्याच्या कार्यस्थळावर वरील गोडाऊन नंबर 6 मध्ये संपन्न झाली सभेत सर्व सभासद कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी खासदार सुजित विखे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कारखाना तुमच्या ताब्यात देतो. कारखाना तुमचाच आहे. आंदोलन करू नका, कोर्टात जाऊ नका, तुमच्या आजोबाच्या नावाने कारखाना आहे. माझ्याकडे दोन कारखाने आहेत तुमच्याकडेही दोन होतील. तो तुम्ही चालवा असे खासदार सुजित विखे पाटील म्हणाले कारखाना तुमचा तालुका तुमचा ऊस तुमचा आहे. तुम्हाला असे वाटत असेल कारखान्याची जमिनी मी विक्रीस काढले आहेत. ते मी नव्हे तर हायकोर्टाच्या आदेशाने कारखान्याच्या सभासदांचे व कामगारांचे देनी देण्याकरिता असे आदेश देण्यात आले होते 
या सभेत महत्त्वाचे असे दोन विषय चर्चेचा ठरला ते म्हणजे कामगार व सभासदांची देणी द्यावी व कारखान्याच्या जमिनी विक्री करण्याच्या संदर्भात असे हे दोन मुद्दे यावेळी महत्त्वाचे ठरले
यावेळी युनियन सदस्य सचिन काळे गुरु यांनी कामगारांचे बाजू मांडली दिवाळी सणानिमित्त कामगार व सभासदाची देणी कामगारांचे पगार व दिवाळीचे बक्षीस देण्यासंदर्भात सचिन काळे गुरु यांनी आपले मनोगत मांडले परंतु या संदर्भात खासदार सुजित विखे पाटील यांनी काही एक भाष्य केले नाही. 

कामगारांना अपेक्षा होती की सुजित विखे यांनी भाष्य करावे. त्यानंतर आप्पासाहेब ढुस यांनी सभासदांची व कारखान्याच्या जमिनी संदर्भात बाजू मांडली यावेळी कुणी किती जमिनी विकल्या व केवढेला विकल्या हे सर्व विषय चर्चेचा ठरला डॉ. तनपुरे  कारखान्याच्या सहा कोटी रुपये बाजार मूल्य असलेल्या गट नंबर 877 मधील  परस्पर विक्री झालेल्या 56 गुंठे जमिनीची चौकशी करावी व जमिनीची परस्पर विक्री करणाऱ्या सर्व संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून परस्पर विक्री केलेली जमीन परत मिळवावी. 
तसेच राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर गट नंबर 542 मध्ये केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास जागा खरेदी योजना राबवून केंद्र शासनाकडून प्रति गुंठा मिळणारे अनुदान कारखान्याला घ्यावे व सदरची जमीन प्रसादनगर वासीयांच्या नावावर करून देण्याची कार्यवाही करावी. जेणेकरून कारखान्याला त्यांचा मोबदला मिळेल व प्रसादनगर वाशीयांची जागा त्यांच्या मालकीची होईल व कामगार व सभासदांची देनीही कारखान्याला देता येईल; असे कारखान्याचे सभासद आप्पासाहेब ढूस, यांनी कामगार व सभासदांची बाजू मांडली.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools