खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुखेड तालुका कार्यकारिणी जाहीर; पत्रकारांना येणाऱ्या समस्या संघटनेकडे मांडाव्यात : जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड

नांदेड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुखेड तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून पत्रकारांना येणाऱ्या समस्या संघटनेकडे मांडाव्यात असे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी आवाहन केले आहे.
संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष उद्धव मामडे, भोकर तालुका उपाध्यक्ष दत्ता बोईनवाड व नाईक यांच्या उपस्थितीत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुखेड तालुक्याची आढावा बैठक घेऊन सर्वानुमते नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.

मुखेड तालुका कार्यकारिणी अशी : तालुका अध्यक्ष जयभीम सोनकांबळे, सचिव विठ्ठल कल्याणपाड, उपाध्यक्ष रवी सोनकांबळे, सहसचिव आसद बल्खी, कोषाध्यक्ष मोती पाशा पाळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली.
पत्रकार म्हणून काम करीत असताना ज्या अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यांनी आपल्या समस्या संघटनेकडे मांडाव्यात.

शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी आम्ही प्रयत्न करणार असून असे विद्यार्थी आढळले तर संघटनेशी संपर्क साधावा असे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड यांनी प्रतिपादन केले. 
संघाचे नूतन मुखेड तालुका अध्यक्ष जयभीम सोनकांबळे यांनी मुखेड तालुका कार्यकारिणी वर्षभरात वेगवेगळे उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले. 

याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मुखेड तालुका नूतन कार्यकारिणीस संघाचे राज्य, विभाग, जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools