खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

नूतन जिल्हाधिकारी ओंबासे यांचे पत्रकार संघाच्या वतीने सत्काराने स्वागत

कळंब उस्मानाबाद - जिल्ह्यातील पत्रकार व जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने नूतन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांचा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांच्या हस्ते सत्कार करून स्वागत करण्यात आले. 
उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंगळवार, दिनांक 11 रोजी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री रणदिवे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे यांचा सत्कार करण्यात आला. 

जिल्हाधिकारी डॉ ओंबासे यांनी, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व प्रधानमंत्री आयुष्यमान योजना या अत्यंत महत्त्वापूर्ण योजनांची माहिती दिली. 
या योजनेतील लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी 12 ,13 व 14 ऑक्टोबर अशी 3 दिवस विशेष मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे .

या मोहिमेचा लाभार्थ्यांनी लाभ घेऊन केवायसी पूर्ण करून दोन्ही योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे .
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, 

पत्रकार संघाचे सरचिटणीस संतोष जाधव, सहसरचिटणीस राजाभाऊ वैद्य, संघटक मल्लिकार्जुन सोनवणे, प्रशांत कावरे, देविदास पाठक, कैलास चौधरी आकाश नरोटे, काकासाहेब कांबळे मच्छिंद्र कदम, प्रा. सतीश मातने, शहाबाज शेख, संगीता काळे, शीला उंबरे आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools