पालघर - विक्रमगड येथे महादेव कोळी समाज उन्नती मंडळ यांच्या वतीने वाघ बारस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आदिवासी समाज निसर्ग पुजक असुन निसर्ग संवर्धन करणे, आदिवासी संस्कृती जोपासणे, व आदिवासी समाजावर होणार्या अन्याया विरोधात एकजुटीने काम करणे गरजेचे आहे असे मत श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केले.
यावेळी वाघ यांनी सांगितले की जव्हार संस्थानचे महाराजांनी विक्रमगड नगराची उपराजधानी म्हणून घोषणा करून येथील आदिवासी बांधवां साठी काम केले, विक्रमगड चा इतिहास गौरवशाली आहे.
या कार्यक्रमात वाघदेवता पुजन करण्यात आले.
विक्रमगड शहरातुन भव्य दिव्य शोभा यात्रा काढण्यात आली तसेच भव्य सभा आयोजित करण्यात आली होती
या कार्यक्रमासाठी महादेव कोळी समाज संघटनेचे सरचिटणीस श्री प्रदीप वारघडे यांनी यशस्वी आयोजन कले होते.
सभेचे अध्यक्ष श्री मगन पाटील यांनी भुशविले, श्री भरत गारे गुरुजी प्रमुख पाहुणे म्हणून, श्री मधुकर खोडे, महादु कडु, पंचायत समिती सदस्य अनिता पाटील, नगरसेविका भारती बांडे, संजना बेंडकोळी,
उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर, राजेंद्र जागले, वैभव मुकणे, मिलिंद झोले अमित कोरडे, कु.निलीमा रांगसे, प्रास्ताविक श्री मनिष गभाले कार्यक्रमाचे आयोजन विक्रमगड व वाडा तालुक्यातील महादेव कोळी समाज बांधव यादव गभाले, अनिल कोथे, रमेश बांडे, नितीन बांडे, सुषमा नडगे आदिवासी सेवक राज्य पुरस्कार प्राप्त , काशिनाथ रांगसे, बाळकृष्ण रांगसे व इतर मान्यवर उपस्थित होते.
0 Comments