जव्हार तालुक्यातील पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक आज रोजी पंचायत समितीच्या सभापती दालनात बिनविरोध पार पडली असून, शिक्षित उमेदवार म्हणून विजया लहारे सभापती पदी तर दिलीप पाडवी यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
तसेच मोखाडा पंचायत समिती सभापती पदी भास्कर बारकू थेतले व उपसभापती पदी प्रदीप वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
जव्हार तालुक्यात स्थानिक पातळीवर ठरल्याप्रमाणे सत्तेच समसमान वाटप पाळला गेला नाही. असे आरोप ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख श्रावण खरपडे आणि माजी उपसभापती चंद्रकांत रंधा केला आहे.
0 Comments