जव्हार: पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये भात,नागली, वरई, हे मुख्य पीक असून ,येथील नागरिक कुटुंबाच्या उपजीविके करिता गरजेपुरता, भात ठेवून उरलेला भात विक्री करणे ,आणि आलेल्या पैशातून आपली दैनंदिन उदरणीरव्हा करणे.सध्या जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागात भात झोडणी करून, जनावरांच्या चाऱ्याकरिता उरलेला पेंढा गोलकृती जमा करून उडवी सजवली जाते.
जव्हार तालुक्यात सुमारे ६५०५.६० हेक्टरमध्ये भात पिकांची लागवड करण्यात आली आहे, गावा - पाडयात भात पीक चांगले आले असून, ठिकठिकाणी भात झोडणीचे काम सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांची झोडणी झाली आहे, अश्या शेतकऱ्यांनी पेंढा रचून ठेवायला सुरुवात केली आहे,त्यास उडवी म्हटले जाते, निसर्गाचा लहरीपणा आणि मजुरांची कमतरता यामुळे, पूर्वीच्या तुलनेत शेती कमी केली जात असल्याचे शेतकरीने आपली वेथा वेक्त केली आहेत.
यंदा भात झोडणीतून आलेल्या पेंढा पुढच्या पावसापर्यंत गुरांना चाऱ्यासाठी,फळे पिकविण्यासाठी, चांगल्या रीतीने साठवणूक करता याव्या यासाठी उडवी करायची पद्धत आहे. उडवी करता येणे आणि ती पावसापासून वाचवता यावी म्हणून योग्य पद्धतीने साकारता येणे, ही एक प्रकारची कला आहे.
अंगणातली उडवी म्हणजे घराची शोभा मानली जात होती,मात्र आज शेतीची संकल्पना बदलली आहे. शेतीचे क्षेत्रही दिवसागणिक कमी होत आहे. गोठ्यातला गुराचा आवाज देखील कमी झाला आहे. जशी शेतात राबणाऱ्या माणसांचे हात कमी झाले.अशा स्थितीत गाव-पाडयात स्वतः पुरती का होईना शेतकऱ्यांची लगबग दिसून येते.
भातझोडणी झाली की कमी जागेत जास्त पेंढ्या रहाव्यात म्हणून विशीष्ट रचनेत पेंढ्याची मांडणी केली जाते, त्याला उडवी असे म्हणतात .
यंदा भात पिकाच्या हंगामाला उशिरा सुरुवात झाली पावसाचा हंगाम लांबला तरी पिकाला चांगला फायदा झाला. कोणत्याही प्रकारे रोगाचा विशेष प्रादुर्भाव झाला नसल्याने भात पीक चांगले आले आहे.असे वसंत नागरे तालुका कृषी अधिकारी यांनी मत वेक्त केले.
0 Comments