खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

नफरत छोडो-संविधान बचाव संवाद यात्रेत सहभागी व्हा - सुभाष घोडके

कळंब - महाराष्ट्र हा नेहमीच पुरोगामी विचारांचा बालेकिल्ला राहिला आहे.पुरोगामी विचारांमुळे महाराष्ट्राची जडण-घडण झाली आहे.हा विचार जिवंत ठेवणे व संविधान आणि संविधानाच्या मूल्याचे संरक्षण करणे गरजेचे आहे.

दिनांक ७ सप्टेंबर पासून कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रेस सुरुवात झाली आहे.
स्वराज इंडिया व स्वराज अभियान आणि जनसंघटना भारत जोडो यात्रेस पाठींबा देण्यास सरसावल्या आहेत. ८ नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येत आहे. 

महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे साहित्य, उस्मानाबाद जिल्ह्यातील गायरान जमीन, एकल महिला सबलिकरण योजना, पारंपारिक कलावंत, निराधार, भूमीहीन, ऊसतोड कामगार, बांधकाम व सफाई क्षेत्रातील असंघटीत कामगारांचे मानधन, औद्योगीकरण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विशेष सवलती आदि मागण्यांची निवेदने नफरत छोडो, संविधान बचाव या यात्रेच्या माध्यमातून कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांना स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांच्या हस्ते दिले जाणार आहे.
नफरत छोडो-संविधान बचाव संवाद यात्रा ०२ नोव्हेंबर पासून कोल्हापूर येथून सुरुवात झाली असून दिनांक ०५ नोव्हेंबर रोजी सायं.७.०० वाजता उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा येथे येत आहे. 

कळंब तालुक्यातील हासेगाव (के) येथील पर्याय संस्थेवर मुक्काम करून दिनांक ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.०० वाजता कळंब येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेस सुरुवात होत असून होळकर चौक - बागवान चौक- सराफ लाईन मधून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक-छत्रपती शिवाजी महाराज चौक- पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नगर परिषद समोर काँग्रेस पक्षातर्फे स्वागत सभा होणार आहे.

स्वागत सभेपूर्वी प्रबुद्ध रंगभूमी संस्था निर्मिती "जागर संविधानाचा" हे पथनाट्य शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी सादरीकरण करणार आहेत. 
स्वागत सभेनंतर ही यात्रा उस्मानाबादला जि.प. कार्यालयासमोरून पदयात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करेल काँग्रेस पक्षातर्फे स्वागत सभा होईल पुढे तुळजापूरला जाईल. 

तुळजापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ही यात्रा लातूरकडे प्रयाण करेल.

तरी सर्वांनी या संविधान बचाव संवाद यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन स्वराज इंडियाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुभाष घोडके यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools